Monday 10 September 2018

शहरात स्वाईन फ्लूसंदर्भात नियोजनात्मक जनजागृती करा

खासदार अमर साबळे यांचे आरोग्य विभागाला सूचना
पिंपरी : स्वाईन फ्लू हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी त्यावर योग्य वेळेत उपचार केल्यास तो निश्‍चित बरा होतो. एच 1 एन 1 या विषाणुमुळे हा आजार पसरतो. साधा फ्लू व स्वाईन फ्लू यांची लक्षणे एकसारखीच असल्याने स्वाईन फ्लू आजाराची त्वरित निदान करून त्यावर वेळीच उपचार केले जात नाही. त्यामुळे हा आजार वाढून नियंत्रणात आणण्यास अवघड होते आणि अशा रूग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. सार्वजनिक ठिकाणी जसे शाळा, महाविद्यालय, कंपनी, कार्यालय यामध्ये स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागृती करावी

No comments:

Post a Comment