Thursday 13 September 2018

झोपडपट्टीतील महिलांना मोफत चादर, ब्लॅकेट, बेडशीट

स्थायी समितीकडून मिळाली मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीतील महिलांना महापालिकेतर्फे प्रत्येकी दोन चादर, दोन बॅरेक केबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट असा संच मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी दोन कोटी 90 लाख रुपये खर्च येणार असून त्याला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. दरम्यान, महिला बचत गटांना देखील साहित्य देण्यात येणार होते. परंतु, उपसूचनेद्वारे बचत गटातील महिलांना साहित्य देण्याचे रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या विभागांतर्गत महिला व बालकल्याण योजना राबविली जाते.

No comments:

Post a Comment