Monday 17 September 2018

मोशी कचरा डेपोत होणार ‘बायोमेडिकल वेस्ट’ प्रकल्प

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालय व दवाखान्यामध्ये निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) व्यवस्थापन सुविधेचा अद्ययावत व उच्च क्षमतेचा प्रकल्प (सीबीएमडब्ल्यूटीएफ) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा प्रकल्पाची यंत्रणा जुनी झाली आहे. त्यामुळे नवा प्रकल्प उभारण्यात येत आहे.  

No comments:

Post a Comment