Saturday 20 October 2018

“राईट टू पी’ धाब्यावर

– महापालिकेत 50 टक्‍के “महिलाराज’ तरीही प्रश्‍न कायम
पिंपरी – “राईट टू पी’ हा अधिकार कायद्याने सर्व महिलांना दिला असला तरी महापालिका प्रशासनाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मध्यंतरी सत्तधाऱ्यांनी महिलांसाठी प्रत्येक चौकात गुलाबी रंगाचे “स्मार्ट टॉयलेट’ बसविण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही स्वच्छतागृहे दिसेनाशी झाली आहेत. महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात 6 हजार 334 स्वच्छतागृह असून त्यापैकी महिला स्वच्छतागृहांची संख्या 2 हजार 853 आहे. 50 टक्‍के देखील स्वच्छतागृह महिलांच्या वाट्याला नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

No comments:

Post a Comment