Tuesday 20 November 2018

तळवडे अग्निशामक केंद्रातील विविध कामे सुरू

अद्ययावत केंद्र तयार करणार
 
तळवडे : तळवडे येथील अग्निशामक केंद्राला सीमाभींत, कार्यालय, कर्मचारी खोली आदी कामे सुरू करण्यात आली आहेत. तळवडे परिसरातील सॉफ्टवेअर पार्क चौकात जकात नाक्याचा शेडमध्ये दोन वर्षांपूर्वी अग्निशामक केंद्राची स्थापना करण्यात आली होती. पुरेशा सुविधांअभावी अग्निशमन केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले होते. या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार येथे सीमाभिंत उभारण्यात येत असून कर्मचार्‍यांसाठी अद्ययावत सुविधा असलेला कक्ष उभारण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न सुुटणार आहे.  यावेळी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगिता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, अग्निशामक विभागाचे अधिकारी ज्ञानेश्‍वर भालेकर, रविंद्र सोनवणे आदी उपस्थित होेते. अग्निशामक केंद्रालगत वनीकरण आहे. त्यामुळे या केंद्रात सरपटणारे प्राणी, भटकी कुत्री तसेच इतर प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. लवकरच या समस्या सुटणार आहेत.

No comments:

Post a Comment