Wednesday 26 December 2018

स्मशानभुमी विकसित करण्यासाठी 40 कोटींची तरतूद करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभुमीलगतची जागा आणि डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करावे. शहरातील 36 स्मशानभुमी, दफनभुमी आणि दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 2019-2020 च्या अंदाजपत्रकामध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्यक तरतुदी कराव्यात, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या शहरातील 36 स्मशानभुमी, दफनभुमीची स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी केली. यावेळी महापौरांना पाण्याची कमतरता, ठिकठिकाणी वाढलेले गवत, घाटांची दुरवस़्था, त्यातील शेड आदी सर्वच ठिकाणी दुरूस्ती करण्याची गरज होती, हे लक्षात आले.

No comments:

Post a Comment