Thursday 6 December 2018

नवउद्योजकांना आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार

शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ’अ‍ॅटो हब’ म्हणून ओळख  : आयुक्त 
बीएनआयच्या ‘मिलान्ज एक्स्पो’ चे उद्घाटन
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवउद्योजक, लघुउद्योजक, कंपन्यांना नेहमीच सहकार्य करते. महापालिकेकडून दिलेल्या पायाभूत सुविधा आणि एमआयडीसीचे भूखंड मागील कालावधीत विकसित झाल्यामुळे शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ’अ‍ॅटो हब’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याला आणखी चालना देण्यासाठी महापालिका अ‍ॅटो क्लस्टर तसेच आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारले आहेत. त्या माध्यमातून टोमोबॉईल, रोबोटिक्स, स्वयंचलित कार, इलेक्ट्रिक कार उद्योगात येणार्‍या नव उद्योजक, कंपन्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी घोषणा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली.

No comments:

Post a Comment