Sunday 1 July 2018

पालिकेतर्फे या कामासाठी कोट्यवधींची तरतूद; आठ महिन्यात काम पूर्ण करणार

‘संत ज्ञानेश्‍वर-संत नामदेव’ भेट समूह शिल्पाचे काम संथगतीने- विरोधकांनी व्यक्त केली नाराजी
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आळंदी-पुणे या पालखी महामार्गावरील वडमुखवाडी येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज-संत नामदेव महाराज भेट समुहशिल्प तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची तरतूद करुनही हे काम रेंगाळले आहे. त्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर, शिल्पाच्या कामासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली असून आठ महिन्यात काम पूर्ण होईल, असा दावा सत्ताधार्‍यांनी केला आहे. वारकरी संप्रदायाची आळंदी व देहू ही दोन्ही तिर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत आहेत. राज्य-परराज्यातूनही या दोन्ही ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण होणा-या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथे काही वर्षांपूर्वी महापालिकेने संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे समुहशिल्प तयार केले आहे. संत तुकाराम महाराजांची भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती एकत्रित आल्याचे या समुहातून दर्शविल्याने आता हा चौक भक्ती-शक्ती चौक या नावाने ओळखला जात आहे. याशिवाय देहू-आळंदी रस्त्यावर मोशी चौकाजवळ वारीत सहभागी झालेली वारकरी महिला व बालकाचे छोटेखानी शिल्प उभारण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment