Sunday 1 July 2018

लोकशाही दिन पुर्ववत सुरु करावा- विकास पाटील

खोट्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल; शहराच्या पर्यावरणाची दुर्दशा चुकीच्या धोरणांमुळे
महापौरांना दिले निवेदन
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरातील विकास व पर्यावरण ह्या मध्ये काहीतरी मोठी गडबड सुरु आहे. आपण आपल्या शहरातील सर्व नद्या प्रदुषित करीत आहोत. आपल्या शहरात अनावश्यक बाबीवर आपण जास्त लक्ष केंद्रित करीत आहोत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर आपण सोयीस्कर रीत्या पांघरूण घालुन प्रलंबित ठेवत आहोत. शहरातील अनेक गटारे थेट नदी पात्रात मैला पाणी सोडले जात आहेत, तेही शुद्धीकरण प्रकिया न करता. तसेच जलपर्णीसारखा गंभीर विषय फक्त बोलण्या पुरताच उरला आहे, अशा अनेक विषयांकडे डोळेझाक केली जात आहे, तरी या गोष्टींचा, इसिएतर्फे पर्यावरणासाठी केल्या जाणार्‍या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, अशा मागणीचे निवेदन महापौर नितीन काळजे यांना देण्यात आल्याचे विकास पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment