Friday 3 April 2020

करोनाचा धोका ओळखण्यासाठी केंद्र सरकारकडून “आरोग्यसेतू’ ऍप सुरू

नवी दिल्ली:  “कोविड-19’शी लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज केंद्र सरकारने खासगी-सरकारी सहकार्यातून विकसित केलेले आरोग्यसेतू नावाचे नवे ऍप सुरू केले. हे ऍप प्रत्येक नागरिकाला करोना विषाणूचा संसर्ग होण्याचा कितपत धोका आहे याचे स्वतःलाच आकलन करून घ्यायला मदत करते. अत्याधुनिक “ब्लू टूथ’ तंत्रज्ञान आणि “आर्टिफिशियल इंटिलीजन्स’चा वापर करून हे ऍप प्रत्येक व्यक्तीच्या समाजातील इतर व्यक्तींशी होणारे व्यवहारांचा आधार घेऊन करोना संसर्गाच्या धोक्‍याची पातळी निश्‍चित करेल.

No comments:

Post a Comment