Tuesday 14 April 2020

अनेक खवय्यांना सतावतोयं जिभेचे चोचले पुरविण्याचा प्रश्‍न

खर्च वाचला : चहा टपरी, वडापाव सेंटर बंद असल्याचा परिणाम
पिंपरी – करोनाच्या प्रतिबंधतेसाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातही त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे चौकाचौकांमधील चहा टपरी, रेस्टॉरंट, शाकाहारी, मांसाहारी जेवणाचे हॉटेल्स, धाबे, भेळ, पाणीपुरी सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे चवदार खवय्यांना जिभेचे चोचले पुरवायचे तरी कसे असा प्रश्‍न सतावू लागला आहे. दरम्यान जमावबंदीमुळे बाहेर पडता येत नसल्याने आता रोजच्या नाष्ट्याची सोय घरातच होऊ लागली आहे. त्यामुळे निदान बाहेरचा खर्च वाचल्यानेकुटुंबीय खूश आहेत.

No comments:

Post a Comment