Monday 13 April 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प

इंडस्ट्री, लघुउद्योजक, सोने-चांदी, वाहन, बांधकाम बाजारपेठा ठप्प
पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दरमहा हजारो कोटींची उलाढाल असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची संपूर्ण उलाढाला “करोना’मुळे ठप्प झाली आहे. शहरातील औद्योगिक वसाहत, लघुउद्योजक, मोठे उद्योजक लॉकडाउनमुळे अक्षरश: चिंतेत पडले आहेत. सोने चांदीसह वाहन, बांधकाम बाजारही पूर्णपणे बंद झाला आहे. 30 एप्रिलनंतर आणखी लॉकडाउन वाढण्याची भीती उद्योजकांना सतावत असून, लॉकडाउन वाढल्यास औद्योगिक वसाहत अक्षरश: कोलमडून जाईल, अशी शक्‍यता अनेकांकडून वर्तविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment