Saturday 2 May 2020

कसा असेल लॉकडाऊन 3.0? 'या' गोष्टींना असणार बंदी

पुणे :  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील 733 जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. यात देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये असून, महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. आरोग्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनचा कालावधी 3 मे रोजी संपल्यानंतर या जिल्ह्यांत निर्बंध लागू राहणार आहेत. याचवेळी ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील तर ग्रीन झोनमध्ये निर्बंध अतिशय कमी प्रमाणात असतील. 

No comments:

Post a Comment