Saturday, 17 May 2014

राष्ट्रवादीचा माज मोडला - आढळराव

शिरुर मतदार संघात 'हॅटट्रीक' साधणारे आपण पहिले खासदार ठरलो आहोत. आपल्या विरोधात राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी सभा घेतल्या. खालच्या पातळीवर जावून प्रचार केला. मात्र, आपल्या पारड्यात भरभरुन मतांचे दान टाकून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा माज मोजला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नोंदविली.

Friday, 16 May 2014

प्रभागस्तरीय कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या बैठका

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिथिलता आलेल्या महापालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्त राजीव जाधव हे 17 व 19 मे रोजी प्रभागस्तरीय बैठक घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचा उद्या (शुक्रवारी) निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेली दीड महिने विकास कामांचा खोळंबा झाला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. विधानसभेची निवडणुकही तोंडावर आली आहे. त्यासाठीही दीड-दोन महिन्यांचा कालावधी आचारसंहितेमध्ये खर्ची होणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभागस्तरावरील तातडीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त जाधव हे लोकप्रतिनिधींच्या समवेत प्रभागस्तरीय बैठका घेणार आहेत. पावसाळा पूर्व कामांचा आढावाही त्यात घेण्यात येईल. दि. 17 मे रोजी 'अ', 'ब' आणि 'क' तर दि. 19 मे रोजी 'ड', 'इ', 'ई' या प्रभागांमध्ये बैठका होतील. तीन तासाची एक बैठक याप्रमाणे आयुक्त एका दिवशी तिन प्रभागांच्या सलग बैठका घेणार आहेत.

काळेवाडीतील दोन अवैध बांधकामे भुईसपाट

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने काळेवाडीतील दोन अनधिकृत बांधकामांवर आज (गुरुवारी) हातोडा टाकला. त्यामुळे भुईसपाट झालेल्या बेकायदा बांधकामांची संख्या 600 पर्यंत पोहोचली आहे.

चिंचवडच्या उड्डाणपुलाचा प्रश्न अजितदादांच्या दरबारात; मंत्रालयात बैठक - आयुक्तांचा कंपनीला इशारा

चिंचवडच्या ‘एम्पायर इस्टेट’ वसाहतीतील रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

20 मिनिटांची एक फेरी अन् धाकधूक !

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकालास आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिल्याने उमेदवार, कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीची पहिली फेरी सकाळी नऊ पर्यंत पूर्ण होणार असून एका फेरीला 20 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मिनिटा-मिनिटाला उमेदवारांची धाकधूक वाढणार आहे.

- पुणे, पिंपरी-चिंचवडला नवा खासदार मिळणार



लोकसभेमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणारा कारभारी कोण असेल, याचे उत्तर शुक्रवारी (१६ मे) दुपापर्यंत मिळणार आहे; जो निवडून येईल तो नवा खासदार असेल हे मात्र नक्की.

Thursday, 15 May 2014

पिंपरी-चिंचवडकरांना सैर करण्यासाठी नवीन १२ उद्याने

शहरातील उद्यानांची संख्या पोहचणार 169 वर 
वैशिष्ट्यपूर्ण उद्यानांच्या उभारणीमुळे नावलौकीक प्राप्त होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नवीन 12 उद्यानांची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील उद्यानांची संख्या 169 वर पोहचणार आहे.  

पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्रफळ 177.3 चौरस किलोमीटर आहे. शहराला 'मॉडेल सिटी' म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. एकीकडे प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर सारख्या प्रकल्पांमधून शहराचा नियोजनबध्द पध्दतीने विकास साधण्याचा महापालिकेचा कयास असताना दुसरीकडे शहर हरीत रहावे याकडेही महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेने 350 एकर जागेवर तब्बल छोटी-मोठी 157 उद्याने विकसित केली आहेत. भोसरी सहल केंद्र, पिंपळेगुरव येथील डायनासोर उद्यान, सांगवीतील शिवसृष्टी उद्यान, कासारवाडीतील संगीत कारंजे असलेले उद्यान यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण उद्याने महापालिकेने उभारली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच विदेशातील उद्यानांचा अभ्यास देखील त्यासाठी केला आहे.