चौफेर न्यूज – एचए कंपनी समोरील बीआरटी बस थांब्यावर टेम्पोची उंची जास्त असल्याने छताला टेम्पो अडकला. हा प्रकार मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. यामुळे बीआरटी मार्गावर वाहतूक बंद झाल्याने मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 4 April 2018
काळेवाडीत सत्संग भवनचे उद्घाटन
चौफेर न्यूज – काळेवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सत्संग भवनाचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते संपन्न झाले.
औद्योगिक परिसरात कचरा पेटवून दिल्यामुळे हवा प्रदूषण
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड औद्योेगिक परिसरातील पेठ क्रमांक 10 येथील अग्नीशमन केंद्राच्या राखीव जागेवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने अनधिकृतपणे चालू केलेल्या कचरा वर्गीकरण केंद्रामध्ये महापालिकेचे आरोग्य कर्मचारी व ठेकेदार निवासी भागातील कचरा येथे गोळा करून आणतात. वर्गीकरण केल्यानंतर उरलेला कचरा पेटवून दिला जातो. यामुळे परिसरात हवा प्रदूषित होत आहे.
शहरातील बंद असलेली खेळाची मैदाने तातडीने पुन्हा सुरू करा – आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनेक खेळाडू बॅडमिंटन खेळासाठी बॅडमिंटन हॉलची मागणी करत असून उपलब्ध हॉल कमी पडत असल्याने खेळाडूंची अडचण होत आहे. महापालिकेच्या स्व:मालकीचे असलेले थेरगाव येथील बॅडमिंटन हॉल व पिंपरीतील ‘काशिबाई शिंदे’ बॅडमिंटन हॉल सद्ध स्थितीत बंद अवस्थेत असून, गोडावून म्हणून त्याचा वापर होत असल्याचे समजते. शहरातील खेळाडूंच्या असलेल्या मागणीचा विचार करता त्यांच्या सोयीकरता सदर हॉल सुरू करणे गरजेचे असल्याचे समजते. सध्या शाळा व महाविद्यालयांचा सुट्ट्यांचा कालावधी सुरू होत असल्याने प्रकर्षाने याची उणीव जाणवणार आहे. तरी, हे सर्व बॅडमिंटन हॉल खेळाडूंना खेळासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावेत. अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनास दिली आहे.
पिंपरी पासपोर्ट केंद्रातून एक वर्षात ३० हजार २५१ नागरिकांना मिळाले पासपोर्ट
पिंपरी (Pclive7.com):- गेल्या वर्षी २ एप्रिल २०१७ रोजी पिंपरी येथे केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड शहरात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत असून या पासपोर्ट कार्यालयातून एक वर्षात ३० हजार २५१ नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहेत.
फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता आमच्याकडे द्या!
जुनी सांगवी (पुणे) : सध्या विविध फळांचा हंगाम सुरू असुन शहरी भागात विविध प्रांतातील फळे पहावयास व चाखावयास मिळतात. सध्या आंबा, सिताफळ यांचा हंगाम असुन आपण घरी आणलेल्या फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता आमच्याकडे संकलित कराव्यात असे आवाहन येथील कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठान व ओम साई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Tuesday, 3 April 2018
प्लॅस्टीक बंदीमुळे भाजीमंडईत रद्दी पेपरला मागणी
जुनी सांगवी (पुणेे) : महाराष्ट्र सरकारने नुकताच प्लॅस्टीक बंदी कायदा लागु केल्याने याची सांगवी परिसरात बहुतांश ठिकाणी याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. सांगवी व परिसरात लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांकडुन जनजागृती करण्यात येत आहे. येथील भाजी मंडई व बाजारपेठेत याचा परिणाम पहावयास मिळत आहे.


Subscribe to:
Posts (Atom)