Saturday 16 June 2012

आयपीएल अंतिम लढतीवर करोडोंचा सट्टा

आयपीएल अंतिम लढतीवर करोडोंचा सट्टा: पिंपरी । दि. २९ (प्रतिनिधी)

आयपीएल - ५ च्या चेन्नई सुपर किंग्ज व कोलकता नाईट रायडर्स या संघाच्या रविवारी झालेल्या अंतिम लढतीवर शहरातून मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला गेला. त्यात करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील तसेच परिसरात ही बुकींग तेजीत होती. त्यामुळे या व्यवहारातील प्रमुख व त्याचे सहकार्‍यांसाठी ती रात्री अधिक उत्पन्न मिळवून देणारी ठरली.

क्रिकेट या खेळात मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला जातो. हे जगजाहीर आहे. याच धर्तीवर इतर खेळावरही सट्टा लावण्याची परवानगी कायद्याने देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, दुसरीकडे नेहमीप्रमाणे आयपीएलच्या प्रत्येक लढतीवर सट्टा लावला जात होता. लढतीच्या तिकिटाचा काळाबाजार झाला. रविवारी रात्री चेन्नईत झालेल्या अंतिम लढतीवर तर अक्षरशा पैशांचा पाऊस पडला.

अंतिम लढत असल्याने अनेक जणांनी मोठय़ा रक्कमेची बाजी लावली. त्यात व्यापारी, व्यावसायिक तसेच नोकरदार मंडळी, क्रिकेटप्रेमींनी नशीब आजमविले. इंटरनेट व मोबाइलच्या माध्यमातून हा व्यवसाय विनासायास केला जातो. जुगारी अड्डे, तरुणांचे गट, क्लब, हॉटेल आदी ठिकाणी बुकींग केली जात होती. आयपीएल लढतीमध्ये किरकोळ रकमेवर नशीब आजमावल्यावर अंतिम लढतीवर खुल्या दिल्याने मोठी रक्कम लावली गेली. गौतम गंभीरची कोलकता पहिल्यांदा बाजी मारणार की, महेंद्रसिंह धोनीची चेन्नई विजय मिळवून हॅट्ट्रिक साधणार यावर मोठी बुकींग केली गेली. तसेच एकादा खेळाडू अर्धशतक किंवा शतक ठोकेल, तसेच सर्वाधिक गडी बाद करेल. संघ इतकी धावसंख्या रचेल यावर बुकींग केली जाते.

No comments:

Post a Comment