Sunday 3 June 2012

'श्रीमंत' महापालिकेचे सभागृहसुद्धा तरुण, श्रीमंत, परिपक्व

'श्रीमंत' महापालिकेचे सभागृहसुद्धा तरुण, श्रीमंत, परिपक्व: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन सभागृह तरुण, श्रीमंत आणि परिपक्व असणार आहे. या निवडणुकीत संधी मिळालेले 85 नवीन चेहेरे सभागृहात दाखल होत आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवक सधन, तरुण, होतकरू आणि उच्चशिक्षित आहेत. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडकरांनी जुन्या-नव्यांचा समतोल साधत नव्या सभागृहाला प्रथमच एक चांगला चेहरा दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही जाणकार, बुजुर्ग नेत्यांमुळे परिपक्वताही आली आहे. महापालिका निवडणूक रिंगणात एकूण 882 उमेदवार होते. त्यातून 128 जागांसाठी "कारभारी' निवडण्यात आले. त्यामध्ये 85 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात सर्वांत तरुण म्हणून युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मयूर कलाटे यांच्या पत्नी स्वाती कलाटे यांचे नाव घ्यावे लागते. सर्वांमध्ये त्या वयाने लहान म्हणजे 21 वर्षांच्या आहेत. राष्ट्रवादीच्या आशा सुपे 26, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अश्‍विनी मराठे 27, तर राष्ट्रवादीचे जितेंद्र ननावरे, विनायक गायकवाड, शीतल काटे व कॉंग्रेसचे जालिंदर शिंदे हे 28 वर्षांचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरण मोटे 29 वर्षांचे आहेत. 73 जण 30 ते 40 वर्षांच्या आतले आहेत.

No comments:

Post a Comment