Tuesday 18 September 2012

भूसंपादनापूर्वीच ठेका

भूसंपादनापूर्वीच ठेका: - प्राधिकरण, महापालिका, एमआयडीसीत समन्वयाचा अभाव
विश्‍वास मोरे। दि. १६ (पिंपरी)

जमिनीचे भूसंपादन नाही, महापालिका व प्राधिकरण यांची सीमा निश्‍चित नाही, एमएसईबी, एमआयडीसी यांच्यातील गुंता अद्यापही सुटला नसताना रस्त्याचा ठेका काढून प्राधिकरण मोकळे झाले आहे. भूसंपादनापूर्वीच प्राधिकरण ठेकेदारावर मेहेरबान असल्याचे दिसून येते. प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या चार वर्षांपासून चिंचवडगाव ते रावेत रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्यांचे घोंगडे भिजत पडले आहे.

जुना जकातनाका चिंचवड ते रावेत असा चार किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता नवनगर विकास प्राधिकरण, महापालिका यांच्या सीमेवरून जातो. ग्रामपंचायत काळात हा रस्ता दहा फुटी होता. नगरपालिकेच्या काळात हा २0 फुटी झाला. पुढे प्रवीणसिंह परदेशी आयुक्त असताना या रस्त्याचे रुंदीकरण करून ८0 फुटी करण्यात आला. पुढे वाल्हेकरवाडी-चिंचवडेनगरचा काही परिसर प्राधिकरणाने केवळ कागदावर संपादित केला असल्याने पुढे या रस्त्याचे काम कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. असे असतानाही केवळ मानवतेच्या भावनेतून महापालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती होत होती. प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी शहरातील रस्ते रूंदीकरणाचे काम हाती घेतले. हा रस्ता रूंद करून ३४.५ मीटर करावा, असा प्रस्ताव तयार केला. मात्र, त्यानंतर कार्यवाही झाली नाही.

No comments:

Post a Comment