Tuesday 20 November 2012

थेरगावात पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर खुनी हल्ला

थेरगावात पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर खुनी हल्ला: पिंपरी/वाकड । दि. १३ (प्रतिनिधी)

हातात कोयते व तलवार घेऊन ६ जणांनी थेरगावातील बापलेकावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले. बापलेकावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.याप्रकरणी राजू गेनूभाऊ बारणे (वय ४४) यांनी फिर्याद दाखल केली आहे. हल्ला करून फरार झालेल्या ववले कुटुंबातील ६ जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

थेरगाव गावठाणात राजू बारणे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. तेथे सकाळी ११.३0 च्या सुमारास दुकानासमोर ६ हल्लेखोर आले व आकाश कोठे आहे, अशी विचारणा ते आकाशचे वडील राजू बारणे यांच्याकडे करू लागले. बारणे यांनी आता सणासुदीचं भांडण करू नका. आपण काय आहे ते नंतर पाहू असे समजावून सांगितले.
तेवढय़ातच आकाश दुचाकीवर तिथे आला. लगेचच त्यांनी आकाशवर हल्ला केला. आकाशला वाचविण्यासाठी राजू गेले असता त्यांच्याही मानेवर वार केले. डोक्यावर हात ठेवल्याने आकाशच्या दोन्ही हातावर पायावर वार करण्यात आले. बापलेकांवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील मनपा निवडणुकीतच या वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर दुसर्‍यांदा बापुजीबुवा यात्रेत (थेरगाव) याचे रुपांतर मोठय़ा भांडणात झाले. त्या वेळी यात्रेत आलेल्या बर्‍याच मोटारीच्या काचा फोडल्या होत्या. या सर्वांचाच राग मनात धरून आज हे तिसरे भांडणात खुनी हल्लय़ाने झाले.

No comments:

Post a Comment