Thursday 22 November 2012

पुण्यात 'लखोबा लोखंडे'ने घातला 14 कोटींचा गंडा

पुण्यात 'लखोबा लोखंडे'ने घातला 14 कोटींचा गंडा
पिंपरी, 16 नोव्हेंबर
स्वतःचे नाव, चेहरा आणि वेशभूषा बदलून शेवटी 'तो मी नव्हेच' असं ठासून सांगणा-या एका 'लखोबा लोखंडे'नं पुणे आणि सातारा परिसरातील 15 ते 20 नागरिकांना सुमारे 14 कोटींचा गंडा घातला आहे. भोसरी पोलिसांसाठी आठ महिन्यांपासून 'वॉन्टेड' असलेला आणि देशभरात हजारो कोटींचा गंडा घालणारा हा भामटा अखेर दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. स्टेशनरी व्यवसायात 10 ते 20 टक्के नफ्याच्या लालसेनं पुण्यातील पिंपरी-चिंचवड, चाकण, राजगुरूनगर या भागातील तसेच सातारा जिल्ह्यातील व्यावसायिक, नोकरदार, शेतक-यांनी या 'श्री 420'च्या नादी लागून आपली कोट्यवधी रुपयांची 'कष्टाची कमाई' गमावली आहे. आता हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यामुळे आपले पैसे परत मिळण्याची आशा त्यांना वाटू लागली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment