Tuesday 18 December 2012

भारत केसरी विजय गावडे याचा देहुकराच्या वतीने सत्कार

भारत केसरी विजय गावडे याचा देहुकराच्या वतीने सत्कार
देहुगाव, 17 डिसेंबर
यशाची पायरी चढत असताना आपल्या मातीचा सुगंध दरवळत ठेवण्याचे कार्य याच मातीत खेळणा-या मल्लांनी केले असल्याचा आनंद होत असल्याची भावना बापुसाहेब भेगडे यांनी व्यक्त केली. देहूगाव येथे भारतकेसरी विजय गावडे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पिंपरी चिंचवडमहानगर पालिकेचे नगरसेवक शांताराम भालेकर, बाळासाहेब तरस, पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, देहूगावचे सरपंच कांतीलाल काळोखे, उपसरपंच आनंदा काळोखे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, प्रसिध्द मल्ल दिलीप पिंजण, साहेबराव काशिद, संजय पिंजण, ज्ञानोबा काळोखे, संतोष माचुत्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश हगवणे, रत्नमाला करंडे, सुनीता टिळेकर, अशोक मोरे, अभिमन्यू काळोखे व कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भेगडे म्हणाले, भारतीय मल्लांना देशांतर्गत स्पर्धेत समाधानी न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उतरावे. भविष्यात गावडे यांनी ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन विययी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत सातकर म्हणाले की, सध्याचे मल्ल पदवीधर असल्याने आनंद वाटतो. मल्ल म्हणजे अडाणी असा लोकांचा गैरसमज आहे. हे विजय गावडे यांनी सिध्द केले आहे याचा विशेष आनंद असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी देहूगाव तालमीतील मल्ल दिलीप पिंजण यांनी विजय गावडे यांना रोख 51 हजार रुपये दिले. देहूगाव तालमीचे वस्ताद तानाजी काळोखे यांनी रोख 5 हजार रुपये देऊन सन्मान केला. अभिमन्यू काळोखे, अशोक मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक तानाजी काळोखे यांनी केले. तर प्रकाश हगवणे यांनी आभार व्यक्त केले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment