Saturday 19 January 2013

चिंचवडमध्ये मंदिरातील तीन दानपेट्या फोडल्या

चिंचवडमध्ये मंदिरातील तीन दानपेट्या फोडल्या पिंपरी - चिंचवडमधील जैन मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. गुरुवारी (ता. 17) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. चार दिवसांपूर्वीच या मंदिराजवळील एका व्यावसायिक इमारतीतील नऊ दुकाने चोरट्यांनी फोडली होती. त्याचा तपास लागलेला नसतानाच मंदिरातील चोरी उघडकीस आल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ आणि श्‍वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. श्री महावीर स्वामी जैन श्‍वेतांबर टेम्पल ट्रस्ट मंदिराचे विश्‍वस्त सुरेश मोतीलाल जैन यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

No comments:

Post a Comment