Saturday 19 January 2013

'शहराला हवेत दोन आयएएस अधिकारी'

'शहराला हवेत दोन आयएएस अधिकारी' पिंपरी - पिंपरी-चिंचवडचा विकास झपाट्याने होत असल्यामुळे शहरासाठी आयएएस दर्जाचे दोन अधिकारी हवेत, अशी अपेक्षा महापालिका आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्‍त केली. 

शहरातील विकासकामांबाबत पत्रकारांनी विचारले असता, डॉ. परदेशी बोलत होते. ते म्हणाले, ""पुणे शहराची लोकसंख्या 32 लाख आहे. तिथे आयुक्‍तांसह दोन अतिरिक्‍त आयुक्‍तही आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा दर 72 टक्‍के इतका असून राज्यात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे. आज शहराची लोकसंख्या 18 लाखांवर पोचली आहे. शहराचा वाढता विकास लक्षात घेता शहरासाठी दोन आयएएस दर्जाचे अधिकारी हवे आहेत.'' 

No comments:

Post a Comment