Wednesday 30 January 2013

विद्यापीठाचा तळवडेत कॅम्पस

विद्यापीठाचा तळवडेत कॅम्पस: पुणे। दि. २९ (प्रतिनिधी)

पुणे विद्यापीठाचा नगर, नाशिक पाठोपाठ आता एक स्वतंत्र कँपस लवकरच पिंपरी चिंचवड परिसरात साकारलेला दिसू शकेल. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५0 एकर जागा विद्यापीठासाठी आरक्षित केली आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही हिरवा कंदील दिला आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथे ही जागा असून विद्यापीठाला २00६ मध्येच या जागेचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु त्यांनंतर सातत्याने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले. व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मात्र या जागेविषयीचा ठराव मांडण्यात आला आणि ही जागा मिळवण्यासाठी विद्यापीठाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी भूमिका सदस्यांनी घेतली.

पुणे विद्यापीठातील भविष्यकालीन योजनांचा वेध घेता सद्यस्थितीत विद्यापीठाकडे असणारी ४00 एकर जागाही विद्यापीठाला कमी पडणार आहे. त्यामुळे ही जागा नव्याने घेण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment