Thursday 14 March 2013

काळेवाडी विषबाधा भातातूनच!

काळेवाडी विषबाधा भातातूनच!: काळेवाडी । दि. १३ (वार्ताहर)

काळेवाडी येथे भाग्यवंती देवी उत्सवातील विषबाधा भातातील जिवाणूंमुळे (बॅक्टेरिया) झाल्याचा प्राथमिक अहवाल एफडीए (अन्न व भेसळ औषध प्रशासन) ला प्राप्त झाला आहे. सांगवी पोलिसांना अद्याप अहवालाची प्रत मिळालेली नाही. उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १) ३५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मात्र त्यांपैकी ३५५ भाविकांना विषबाधा झाली. यातील दोघांचा मृत्यू झाला.

एफडीएच्या अन्न सुरक्षा विभागाने तूरडाळ, भगर, खाद्यपदार्थांचा रंग, मिरची, हळद, धना पावडर, तेल आदी १३ पदार्थांसह शिरा, भात, वरण, भाजी, चपाती यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. तयार भातामध्ये जिवाणू आढळल्याचे राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालाची
प्रत महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment