Monday 1 April 2013

एलबीटी आजपासून - पिंपरी-चिंचवड महापालिका यंत्रणा सज्ज

एलबीटी आजपासून - पिंपरी-चिंचवड महापालिका यंत्रणा सज्ज: पिंपरी । दि. ३१ (प्रतिनिधी)

जकातीला पर्याय म्हणून स्थानिक संस्था कराची (एलबीटी) उद्यापासून पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे लागू करण्यात येणार आहे. या नवीन कर प्रणालीसाठी महापालिका यंत्रणा सज्ज आहे. एलबीटी लागू करू नये, या मागणीसाठी शहरातील व्यापारी, लघुउद्योजक, तसेच पेट्रोल पंपचालक उद्या सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. व्यापारी मनपावर मोर्चाही काढणार आहेत.

एलबीटी नको या मागणीसाठी पिंपरी चिंचवड फेडरेशन ऑफ असोसिएशनने उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नऊला निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातून मोर्चास प्रारंभ होणार आहे. तो आकुर्डी, चिंचवड, मोरवाडी मार्गे महापालिका भवनापर्यंत येणार आहे. यामध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment