Wednesday 8 May 2013

काळेवाडीत पुन्हा हातोडा मोहीम

काळेवाडीत पुन्हा हातोडा मोहीम: रहाटणी । दि. ७ (वार्ताहर)

वर्षभरापासून सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मार्च २0१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणारच, अशी भूमिका शासनाने सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेतली. त्यानंतर शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाई पुन्हा तीव्र झाली आहे. काळेवाडी येथील पंचनाथ कॉलनीमधील धर्मेश सोनेजी यांच्या मालकीची ६ हजार २00 फूटाचे बांधकाम भुईसपाट केले. अत्यंत गुंतागुंतीच्या ठिकाणी असणार्‍या इमारतीवर कारवाई करताना पालिका अधिकार्‍यांना मोठी कसरत करावी लागत होते. इमारतीच्या तिन्ही बाजूंनी घरे असल्याने मोठी दक्षता घ्यावी लागत होती. तसेच इमारतीचे काम भक्कम नसल्याने पोकल्ेनच्या साहाय्याने सहज पाडले जात होते.

ड प्रभागाचे कार्यकारी अभियंता गुलाब दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. उपअभियंता रामनाथ टकले, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, ए. टी. घेरडे, तसेच २ जेसीबी, एक पोकलेन, १0 अतिक्रमण विभागाचे पोलीस कर्मचारी, पालिकेचे १0 मजूर, सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांच्यासह ४ कर्मचारी तैनात होते. सकाळी ११ ला सुरू झालेली कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती.

No comments:

Post a Comment