Wednesday 8 May 2013

प्रॉपर्टी घेताय, सावधान!

प्रॉपर्टी घेताय, सावधान!: - आयुक्त श्रीकर परदेशी यांचे नागरिकांना आवाहन
संजय माने । दि. ७ (पिंपरी)
स्वत:साठी अथवा नातेवाईक मित्र यांपैकी कोणाला पिंपरी-चिंचवड शहरात भूखंड अथवा सदनिका खरेदी करायची, तर सावधानता बाळगा. योग्य ती माहिती घ्या, मगच व्यवहार करा अन्यथा फसगत होईल. असा सबुरीचा सल्ला कोणी पोलीस अधिकार्‍याने अथवा सामाजिक कार्यकर्त्याने नव्हे, तर महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून दिला आहे.

आयुक्तांच्या नावे शहरातील अनेक लोकांच्या मोबाईलवर हा संदेश पोहोचला आहे. आयुक्त परदेशी यांच्या नावाने आलेला मोबाईलवरील संदेश सर्वांना अचंबित करणारा आहे. सदनिका खरेदीच्या व्यवहारात कोणाची फसवणूक होऊ नये, याची दक्षता म्हणून आयुक्तांनी एकाच वेळी अनेकांना एसएमएस पाठवला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोणी सदनिका अथवा भूखंड खरेदी करणार असेल, तर त्यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर त्या प्रॉपर्टीसंबंधीची माहिती पाहावी. इमारत असेल, तर ती अधिकृत की अनधिकृत आणि भूखंड असेल तर त्यावर महापालिकेचे आरक्षण आहे का, यासंबंधीची माहिती www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. बांधकाम नियमावली आणि कमी आकाराच्या जागेत बांधकाम कसे करता येईल, याची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे.

No comments:

Post a Comment