Friday 30 August 2013

महापालिकेच्या बंद इमारतीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या बंद इमारतींच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईत घडलेली बलात्काराची घटना अशाच निर्जन ठिकाणी घडली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेने पालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या इमारतींना कुंपण घालावे व सुरक्षारक्षक नेमावे अशी मागणी  युवा सेनेने केली आहे.

No comments:

Post a Comment