Wednesday 21 August 2013

महापालिका सुरू करणार फेसबुक अकाउंट


- मोबाइल अँप्सचा अवलंब : ई-ऑफिस नवे सॉफ्टवेअर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १0 विभागांच्या ई-ऑफिसचे काम पहिल्या टप्प्यात करणार असून, येत्या २ सप्टेंबरपासून पिंपरी चिंचवड महापालिकेचे फेसबुक अकाउंट सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले. तसेच जानेवारी २0१४ पयर्ंत ई-ऑफिसचे सॉफ्टवेअर तयार होणार असल्याची माहितीही आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.महापालिकेच्या वतीने यशदा पुणे येथे माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या अर्बन ई-गव्हर्नन्स कार्यशाळेमध्ये आयोजित सत्रात ई-गव्हर्नन्स प्रकल्प व नवीन उपक्रम याबाबत त्यांचे सादरीकरण झाले त्या वेळी ते बोलत होते.आगामी वर्षाचे नियोजन महापालिकेने केले असून फेसबुक सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ई-गव्हर्नन्सचे वेगवेगळे नमुने तयार करण्यात आले आहेत. आगामी वर्षामध्ये नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागात नागरी सुविधा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. मोबाईल अँप्सच्या माध्यमातून येत्या वर्षात टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत विविध सेवा सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सादरीकरणावेळी सांगितले. 

No comments:

Post a Comment