Monday 26 August 2013

प्रशिक्षित शहर नियोजकांची फळी निर्माण करायला हवी

पिंपरी : जमिनी आणि सदनिकांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने नागरिकांकडून अनधिकृत बांधकामे केली जातात. परंतु कालांतराने ही बांधकामे निष्कासित करावी लागतात. त्यातून रहिवाशांचे नुकसान होते. कायदा आणि सुव्यवस्थेपुढेही आव्हान उभे राहाते, असे प्रश्न उदभवूच नयेत यासाठी प्रशिक्षित शहर नियोजकांची (टाऊन प्लॅनर्स) फळी निर्माण करावी लागेल, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आकुर्डी स्टेशन येथे व्यक्त केले. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील प्रलंबित प्रश्नाबाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. 

No comments:

Post a Comment