Tuesday 17 September 2013

गुन्हा दाखल केल्याने वीज कर्मचार्‍यांचा संप

भोसरी : वीज डीपीमुळे विजेचा झटका बसून १ जूनला झालेल्या बालकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी वीज कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे संतप्त झालेल्या वीज कर्मचार्‍यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे एमआयडीसीतील बराचशा भागात पहाटेपासूनच वीज गायब झाली होती. ऐन सणासुदीत वीज गेल्याने नागरिकांनी या आंदोलनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

No comments:

Post a Comment