Friday 1 March 2013

अर्थसंकल्पात योजना जुन्या, तरतुदी नव्या

अर्थसंकल्पात योजना जुन्या, तरतुदी नव्या: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

महापालिका अर्थसंकल्पात ‘जेएनएनयूआरएम’ योजनेच्या जुन्याच अर्धवट प्रकल्पांसाठी नव्याने तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यटनास चालना देण्याच्या प्रकल्पासह ‘वायसीएम’ रुग्णालयाला संलग्न असे वैद्यकीय पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रम केंद्र हे यंदाच्या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहेत. मिळकतकरात १ टक्का वाढवून सामान्यांवर कराचा बोजा टाकला आहे. समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले असले, तरी तरतूद स्पष्ट केलेली नाही.

२0२४ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त श्रीकर परदेशी यांनी स्थायी समितीकडे सादर केला. मूळ २८२४ कोटींसह जे एनएन यू आर एम च्या १२२४ कोटींसह एकूण ३२४८ कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. अखेरची की आरंभीची शिल्लक २ कोटी ३८ लाख इतकी आहे. प्रशासकीय सुधारणांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचा या अर्थसंकल्पात आवर्जून समावेश केला आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी आखलेल्या दहा कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. जमा तपशिलात जकातीचे १२00 कोटी उत्पन्न अपेक्षित धरले आहे. मिळकतकरापोटी २५0 कोटी, पाणीपट्टी ५८ कोटी, बांधकाम परवानगी विभागा कडून २५0 कोटी, गुंतवणुकीवरील व्याज ४१ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment