Friday 1 March 2013

हिंजवडी, चांदखेड, थेरगावचे तिघे अटक

हिंजवडी, चांदखेड, थेरगावचे तिघे अटक: - माथाडीच्या नावाखाली खंडणी
पिंपरी। दि. २८ (प्रतिनिधी)

माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्यकर्ते असल्याचे सांगून हमालीच्या नावाखाली ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून ३६ हजार रुपये उकळणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. विकास बाबुराव शिनगारे (वय ३२, रा. सोनई, पवारनगर, थेरगाव), बाळासाहेब अरुण निकम (३१, रा. देशमुखवाडी, सदाशिव पेठ), अजय देवराम येवले (२५, रा. चांदखेड, मावळ), संजय ऊर्फ लाला गुलाब जांभुळकर (३0, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) अशी त्यांची नावे आहेत.

बाहेरगावाहून शहरात काही माल आल्यावर काही जण या गाड्यांचा पाठलाग करतात. जेव्हा सामान उतरविले जाते. तेथे जाऊन तुम्ही जरी स्वत: अथवा अन्य लोकांकडून माल उतरुन घेणार असला तरी माथाडी कायद्याप्रमाणे तुम्हाला हमाली द्यावी लागेल, आम्ही कामगार युनियनचे कार्यकर्ते असल्याचे ते सांगत आणि जबरदस्तीने पैसे वसूल करीत असत. अशा अनेक तक्रारी यापूर्वी अनेकदा आल्या होत्या.

याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुकत शहाजी सोळुंखे यांनी सांगितले, की या आरोपींनी ६ व ७ फेब्रुवारी रोजी आर. आर. रोडवेजचे सुपरवायझर दीपक शर्मा यांच्याकडे ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. सिसको कंपनीच्या आवारात मुंबईहून कंटेनरमधून आणलेले साहित्य खाली उतरविण्यासाठी मजुरीपेक्षा जास्त पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर माल उतरवू देणार नाही, अशी धमकीही दिली होती. आरोंपीनी शर्मा यांच्याकडून ३६ हजार रुपये उकळले होते.

No comments:

Post a Comment