Wednesday 26 February 2014

निसर्ग आणि भक्ती यांचा संगम- भंडारा ...

(वर्षा कांबळे)
देहुगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असणा-या श्री क्षेत्र भंडारा डोंगराला मावळ तालुक्यातील धार्मिकस्थळ म्हणून महत्वाचे स्थान आहे. तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सुंदर व निसर्गरम्य व शांत वातावरण हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे.  म्हणूनच संत तुकाराम महाराज याठिकाणी ईश्वर चिंतनात मग्न होत असत. याच डोंगरावर निसर्गाच्या सान्निध्यात बसून तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. आज हे ठिकाण धार्मिक स्थळ म्हणून विकसित होत आहे.

No comments:

Post a Comment