Thursday 20 March 2014

लघुउद्योगांकडे लक्ष देणारा खासदार हवा

सध्या राज्यात लघुउद्योजकांची ससेहोलपट सुरू आहे. टॅक्समुळे व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. अनेक उद्योजक परराज्यांत उद्योग हलवीत आहेत. त्यामुळे या राज्यात टॅक्स व वीज यांवर शासनाने पॅकेज आणले पाहिजे. जेणेकरून लघुउद्योजकांना नवसंजीवनी मिळेल. निवडून जाणार्‍या खासदारांनी लघुउद्योगाच्या बाबतीत संसदेत ठोस निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्समधून सूट मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या छोट्या उद्योजकांना उद्योग करणे असहय़ झाले. त्यासाठी खासदारांनी झगडण्याची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. सध्या देशात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने उद्योजकांपुढे व्यवसायाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भरमसाट टॅक्सआकारणी केली जाते. त्यात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. लघुउद्योजकांना ग्लोबल मार्केटमध्ये स्पर्धा करायची म्हटली, तर ते आव्हान ठरत असल्याने शासनाने उद्योजकांच्या फायद्याचे पॅकेज जाहीर करावे. कर, वीजबिलात सवलत मिळेल, असे काही तरी करावे. जेणेकरून लघुउद्योजकांचे स्थलांतर टळेल.

No comments:

Post a Comment