Wednesday 26 March 2014

फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, तिच्यासाठी पोटापाण्याचे साधन

पिंपरी : काम-धंदा न करणार्‍या उडाणटप्पूंनासुद्धा निवडणूक काळात प्रचाराचा झेंडा घेऊन उभा राहिला तरी भरपेट जेवण आणि किमान ३00 रुपये मिळतातच. अशा वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. मात्र, स्वकष्टाने पैसे मिळविण्याची धडपड करणारी महिला निवडणूक काळात गर्दीच्या ठिकाणी दिसून येऊ लागली आहे. शक्तिप्रदर्शन, मेळावे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फेकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तिच्यासाठी पोटापाण्याचे साधन बनल्या आहेत.
कचर्‍यातील भंगार वेचून त्याच्या विक्रीतून पोटापाण्याची भ्रांत मिटविणे हा नित्यक्रम असलेल्या झोपडीतील वृद्धेला रस्त्यांवर, मेळाव्याच्या ठिकाणी, सभागृहांमध्ये एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आढळून येऊ लागल्या आहेत. सर्मथक म्हणून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्याची यंत्रणा उमेदवाराने कार्यान्वीत केल्याचे मंगळवारी शक्तिप्रदर्शनाच्या वेळी दिसून आले. 

No comments:

Post a Comment