Wednesday 26 March 2014

'उथळ' भूकंपाने दिघी ते शिवाजीनगर भाग हादरला

शिवाजीनगर ते दिघी परिसर आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजून 24 मिनिटांनी सौम्य उथळ स्वरुपाच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या भूकंपाची खोली पाच किलोमीटर आणि तीव्रता रिश्टर स्केलवर 3 इतकी नोंद करण्यात आली आहे.
दिघी, भोसरीचा काही भाग, विश्रांतवाडी, शिवाजीनगर आदी भागातील रहिवाश्यांना भूकंपाचा धक्का चांगलाच जाणवला. भोसरी रेडझोन परिसरात लष्कराच्या वतीने दारुगोळ्याचा सराव करण्यात येतो. या सरावामुळे भोसरी, दिघी परिसरात वारंवार हादरे जाणवत असतात. मात्र, नेहमी जाणविणा-या हाद-यांपेक्षा आजचा हादरा वेगळ्या स्वरुपाचा जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. पुणे हवामान खाते आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्याची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर हा भूकंपाचाच धक्का होता, असे स्पष्ट झाले.   

No comments:

Post a Comment