Saturday 19 April 2014

क्रांतीवीर दामोदर हरि चापेकर

आज दामोदर हरि चापेकर यांचा आज (18 एप्रिल) बलिदानदिन ! इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने, प्रेरणेने ऐन तारुण्यात स्वत:च्या प्राणाची आहुती देणार्‍या या क्रांतिकारकाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख प्रपंच !
दामोदर हरि चापेकर यांचे घराणे मूळचे कोकणातील वेळणेश्वरचे; मात्र त्यांचे पूर्वज पुण्याजवळील चिंचवडला येऊन स्थायिक झाले. तेथेच 25 जून 1869 रोजी दामोदरपंतांचा जन्म झाला. लहानपणापासूनच दामोदरपंत, त्यांचे दोन्ही बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव यांचा ओढा हिंदुस्थानला परदास्यातून मुक्त करण्याकडे होता. क्रांतीकार्याची आवश्यकता म्हणून ते प्रतीदिन बाराशे सूर्यनमस्कार घालीत, तसेच एका तासात अकरा मैल पळण्याचाही वेग त्यांनी प्राप्त केला होता !

No comments:

Post a Comment