Friday, 4 November 2016

विलास लांडेंनी उपसले बंडखोरीचे हत्यार

विधानपरिषदच्या पुणो स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी बुधवारी (दि. २) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने लांडे यांनी २00९ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणो पुन्हा बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. लांडे यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. तर, या निवडणुकीमुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शहरातील राजकारणाही ढवळून निघणार असून राष्ट्रवादीत दुफळी माजण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment