Friday, 30 December 2016

मागोवा 2016

पिंपरी : वेळ थांबल्याशिवाय आणि साल सरल्याशिवाय राहत नाही. २0१६ हे साल पिंपरी-चिंचवड शहरासाठी कडू-गोड आठवणी व स्थित्यंतराचे ठरले. स्वच्छ भारतमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणार्‍या शहरात स्मार्ट सिटीची खदखद मात्र, वर्षभर होती. आगामी महापालिका निवडणुकीमुळे शहरात कारभार व राजकारण चर्चेचा विषय ठरले. भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशीच्या फेर्‍या, नगरसेवकांचे राजीनामे आणि महासभेतील धिंगाणा या सगळ्यामुळे महापालिकेचा कारभार वर्षभर गाजला. तर, राजकीय पुनर्वसनासाठी शहरातील दिग्गजांमधील चढाओढ, पक्षांतराच्या बेडूकउड्या आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे पिंपरी-चिंचवडचे राजकारणही सरत्या वर्षात चांगलेच ढवळून निघाले.

No comments:

Post a Comment