Tuesday, 3 January 2017

भाजप-सेना युतीचं घोडं अडलंय कुठं ?

खासदारांमधील तेढ युतीचा अडथळा स्थानिक नेते आशादायी : सर्व्हेमुळे भाजप-सेना ताळ्यावर
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हटवून पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज करण्याची स्वप्ने भाजप व शिवसेनेला पडत आहेत. त्यात सुरुवातीला स्वतंत्र लढण्याचा आव आणणारे दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते त्यांनीच केलेल्या सर्व्हेनंतर आपली खरी ताकद उमगल्याने ताळ्यावर आले आहेत. दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते युतीसाठी आशादायी आहेत, परंतु प्रत्यक्ष बोलणी पुढे सरकताना दिसत नाही. त्यामुळे युतीचं हे घोडं अडलंय कुठं, असा सवाल शहराच्या राजकीय वतरुळात चर्चिला जात आहे

No comments:

Post a Comment