Thursday 8 June 2017

महापौर निधीत वाढ होणार?

– 3 कोटींच्या तरतूदीत उपसूचनेद्वारे दोन कोटींची भर 
– 122 पैकी 22 उपसूचनांना प्रशासकीय मान्यता 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत अचानक उद्‌भवणाऱ्या आपत्ती किंवा आकस्मित घटनेच्या उपाययोजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा. याकरिता महापौर विकास निधीमध्ये प्रत्येक वर्षीच्या महापालिका अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. यंदा महापौर विकास निधीत वाढ करण्याच्या सत्ताधारी भाजपने केलेल्या उपसूचनेला मुख्य लेखा विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सन 2017-18 आर्थिक वर्षांतील मूळ अंदाजपत्रकात केलेली 3 कोटीच्या तरतुदीत आणखी 2 कोटीची भर पडणार असून, महापौर विकास निधी आता 5 कोटीवर जाणार आहे. परंतु, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळ पाहता महापौर विकास निधी गेल्या तीन वर्षांत खर्ची न पडल्याने, तो निधी अन्यत्र विविध कामांवर खर्ची टाकण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment