Monday 24 July 2017

पवना धरणातून पाणी सोडण्याची शक्‍यता

– नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी – संततधार पावसामुळे पवना धरण पाणलोट क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. जुलै महिन्यातच धरण पुर्ण भरत आले आहे. रविवारी (दि. 23) रात्री पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणामध्ये 90 टक्‍क्‍यापेक्षा जास्त पाणीसाठा होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment