Saturday, 19 August 2017

हिंजवडी-माण एसी बससाठी नऊ टप्प्यांत आकारणी

पुणे, दि. 18 – हिंजवडी परिसरातून विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यांच्या वातानुकुलीत सेवा दिल्यास प्रवाशी पीएमपीचा वापर करतील. यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने 15 जून 2017 पासून पुणे विमानतळ ते हिंजवडी माण फेज 3 ही वातानुकुलीत बससेवा सुरू केली. त्यासाठी पुणे विमानतळ ते सिमला ऑफीस या अंतरासाठी प्रवाशाला 120 रुपये तर पुणे विमानतळ ते हिंजवडी माण फेज 3 या अंतरासाठी प्रवाशाला 180 रूपये तिकिट आकारण्यात येत आहे. मात्र, हा दर अधिक असून तो टप्प्या-टप्प्यात घ्यावा, सलग घेऊन नये अशी मागणी प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे केली. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने नऊ टप्प्यात हे दर आकारले आहेत.

No comments:

Post a Comment