Thursday, 24 August 2017

विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार दुसरे सभागृह

दैनिक प्रभातच्या बातमीची घेतली दखल
पिंपरी – महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयासाठी थेरगाव येथील शाळेच्या मूळ इमारतीच्या रचनेत कसलाही बदल होणार नाही. शाळेतील सांस्कृतिक सभागृहाच्या बदल्यात विद्यार्थ्यांसाठी शाळेतच सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत पालक किंवा शिक्षकांनी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी दिली. शाळेच्या सभागृहाचा अधिकाऱ्यांनी ताबा घेतला होता. दै. प्रभातने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने सभागृह उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.

No comments:

Post a Comment