Sunday, 24 September 2017

अण्णा भाऊ साठे स्मारक समितीवर गोरखे

पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून घाटकोपर परिसरातील चिरागनगरात लोकशाहिरांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या समितीत पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांचा समावेश करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment