Monday 16 October 2017

शिवसेनेतील गटबाजी संपणार का?

पिंपरी – राज्यात सत्तेत भागीदार असणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने खटके उडत आहेत, तसेच कोणत्या न कोणत्या कारणावरून फटकेबाजी सुरू आहे. त्यातच शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि मध्यावधी निवडणुकांची ही शक्‍यता निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची मोट व्यवस्थित बांधण्याचा शिवधनुष्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खांद्यावर घेतला आहे. राऊत सध्या स्वत: पिंपरी-चिंचवड व परिसरात पक्षाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. पक्षाच्या बळकटीसाठी विधायक पाऊल मानले जात आहे, परंतु शहरातील पक्षाचे दोन खासदार आणि एक आमदार यांच्यातील मतभेदाचे राजकारण, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली गटबाजी अशी अवघड आव्हाने पक्षासमोर आहेत. गटतट संपुष्टात आणण्यासाठी नेत्यांची इच्छाशक्ती महत्वाची ठरणार आहे. राऊत यांच्या मध्यस्थीने एकसंधपणा साधला जाणार का? असा ही प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे.

No comments:

Post a Comment