Saturday 9 December 2017

हिंजवडीचा पर्यायी रस्ता अखेर ‘ट्रॅक’वर

एप्रिलपर्यंत काम पूर्ण करा : पालकमंत्री बापट यांचे आदेश, मुंबईत बैठक 

पुणे /पिंपरी – ‘आयटी हब’मध्ये पोचताना वाहतूक कोंडीमुळे आयटीयन्सची होणारी दमछाक रोखण्यासाठी हिंजवडीच्या पर्यायी रस्त्यांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिले आहेत. विशेष बाब म्हणून चांदे-नांदे या रस्त्याची निविदा एका महिन्यात काढण्याचा निर्णय मुंबईतील विशेष बैठकीत घेण्यात आला.
हिंजवडी आयटी पार्क मधील समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मंत्रालयात गुरुवारी (दि.7) विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव, “पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment