Wednesday 20 December 2017

बोपखेलमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी

चौफेर न्यूज – बोपखेल परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भागात गुन्हेगारीही त्याचप्रमाणात वाढत असून बोपखेलमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी माय माऊली प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश तेजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदींना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बोपखेलची सद्यस्थितीत 25 ते 30 हजार लोकसंख्या असून गोरगरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय आदी नागरिकांचे वास्तव्य आहे. परंतु, बोपखेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. पोलीसात तक्रार देण्यासाठी नागरिकांना भोसरी येथील पोलीस ठाण्यात 10 ते 15 किलो मीटरचा वळसा मारून यावे लागते. त्यामुळे अनेक नागरिक तक्रार देण्याचे टाळतात. तथापि, बोपखेलसाठी त्वरीत स्वंतत्र पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी माय माऊली प्रतिष्ठानचे रूपेश तेजी, रामदास गोसावी, स्वप्निल मेदगे आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment